पोस्टपेड आणि प्रीपेड सिम मध्ये फरक काय आहे?
आपल्याकडे दोन प्रकारचे सिम वापरले जातात. एक प्रीपेड (Prepaid) आणि दुसरे पोस्टपेड (Postpaid). तसं बघायला गेलं तर हे दोन्ही सीम सारखेच दिसतात पण दोघांमध्ये खूप फरक आहे. प्रीपेड म्हणजे काय ? पोस्टपेड म्हणजे काय? यातला फरक आपण आज बघणार आहोत.
What Is Difference Between Prepaid And Postpaid
पोस्टपेड सीम मध्ये आपण निवडलेल्या प्लॅन नुसार त्याचे बिल येते आणि प्रीपेड मध्ये आपण आपल्या गरजेप्रमाणे रिचार्ज करू शकतो. समजा, प्रीपेड मध्ये आपण 499 रुपयाचा रिचार्ज केला तर आपल्याला त्याचा पुढच्या महिन्यात आपल्या बजेटनुसार 299 रुपयाचा रिचार्ज करता येतो.
पण त्याच विरुद्ध पोस्टपेड मध्ये 499 रुपये चा रिचार्ज केल्यावर तुम्हाला त्यामध्ये जीएसटी सुद्धा द्यावा लागतो. जसे की, 499+GST=588.8. पोस्टपेड मध्ये तुमची गरज असो नसो किंवा बजेट नसेल तरी तुम्हाला 499 रुपये भरावे लागतात.
पोस्टपेड मध्ये तुम्हाला जो डेटा तुमच्या पॅक मध्ये मिळतो तो तुम्ही त्या महिन्यात वापरला नाही तरी कंपनीच्या नियमानुसार तो डेटा तुमच्या पुढच्या महिन्याचा प्लॅनमध्ये समाविष्ट केला जातो. आणि तो डेटा तुम्ही वापरू शकता. प्रीपेड मध्ये त्या दिवशीचा प्लॅन मध्ये दिलेल्या डेटा वापरावा लागतो जर तुम्ही तो वापरला नाही तर तो संपून जातो. आणि दुसर्या दिवशी तुमच्या प्लॅन नुसार तुम्हाला 1GB, 2GB यापैकी जो असेल तो दिला जातो.
प्राईम व्हिडीओ, डीजनी हॉट स्टार, नेटफ्लिक्स, जी फाईव्ह, वूट या प्रकारचे जे ओटीटी प्लॅटफॉर्म आहे त्यांचे सबस्क्रीप्शन हे प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही मध्ये दिले जाते. त्यामध्ये प्रीपेड मध्ये एक महिन्यासाठी ट्रायल असते आणि पोस्टपेड मध्ये एक वर्षासाठी.
तर तुम्हाला प्रीपेड सिम घ्यायचं की पोस्टपेड, हे विचार करूनच तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला जे सबस्क्रीप्शन पाहिजे ते ट्रायल आहे की पूर्ण एक वर्षासाठी आहे आणि त्याच बरोबर ते मोबाईल डिव्हाईस साठी मिळते आहे की त्यामध्ये आपण टीव्ही सुद्धा चालवू शकतो. पहिले तर तुम्ही तुमची गरज समजून घ्या, जसे की तुमच्या घरात किती लोक आहे ज्यांचे फोन तुम्हाला रिचार्ज करावे लागतात. कारण पोस्टपेड मध्ये वोडाफोन/आयडिया, एअरटेल आणि जिओ मध्ये पण तुम्हाला असे प्लॅन भेटतात की ज्यामध्ये तुम्ही एक किंवा तीन लोकांना एकत्र जोडून वापरू शकता आणि सर्वांचे बिल हे एकत्र येऊन ते तुम्हाला स्वस्त देखील पडू शकत.
जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या साठी प्रीपेड हे चांगले आहे. प्रीपेड मध्ये जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही रिचार्ज करू शकता. रिलायन्स जिओ आल्या नंतर खूप सारे प्रीपेड प्लान हे स्वस्त देखील झाले आहे. प्रीपेड मध्ये सर्वात महत्त्वाचे असते की तुम्हाला याचं बिल येण्याच टेन्शन नसतं.
पोस्टपेड मध्ये जर तुम्ही आरामात एक महिन्याचं बिल हे भरू शकत असेल आणि तुमच्या फोनचा वापर आणि डेटा वापरणे हे एक नियमित असेल तर पोस्टपेड तुमच्यासाठी चांगले आहे. तसेच तुम्हाला त्यामध्ये तुमच्या प्लॅननुसार वेगवेगळ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मचा सबस्क्रीप्शन मिळते. बरोबर तुमचा डेटा लिमिट हे संपत आल्यावर नेटचा स्पीड हा तसाच राहतो तो कमी होत नाही.