फोन पे, गुगल पे, पेटीएम मध्ये सर्वात चांगले अ‍ॅप कोणते ?

आज आपण जाणून घेऊया, की फोन पे, गुगल पे, पेटीएम यापैकी सर्वात चांगले एप्लीकेशन कोणते आहे. नोटबंदी नंतर असे भरपूर एप्लीकेशन आले की ज्या द्वारे पैसे पाठवणे सोपे झाले. त्याचबरोबर रिचार्ज करणे, बिल पेमेंट करणे आणि खूप प्रकारचे कॅशलेस ही सुविधा पण ह्या व्दारे आपल्याला देण्यात आली. एवढे एप्लिकेशन आल्यानंतर आपण कन्फ्युज पण झालो की कोणते एप्लिकेशन चांगले आहे त्याचबरोबर सर्वात सोपे आणि फायद्याचे एप्लीकेशन कोणते आहे. आपण तेच बघणार आहोत की सर्वात चांगलं एप्लिकेशन कोणत आहे.

फोन पे, गुगल पे, पेटीएम मध्ये सर्वात चांगले अ‍ॅप कोणते ?

Google Pay vs PhonePe vs PayTm Marathiपेटीएम, गुगल पे, आणि फोन पे हे तीन असे एप्लिकेशन आहे की खूप चांगले आणि मार्केटमध्ये खूप दिवसापासून आहे. खूप लोक हे तिन्ही एप्लिकेशन वापरतात तरीही या तीनही एप्लीकेशन पैकी कोणत चांगला आहे ते बघूया.

1) फोन पे (PhonePe)

हे ऍप्लिकेशन डिसेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. पण ते ऑगस्ट 2016 मध्ये मार्केटमध्ये आले म्हणजे ते इतरांना वापरण्यासाठी देण्यात आले. फोन पे हे ऍप्लिकेशन फ्लिपकार्ट द्वारे मॅनेज करण्यात येते. आपल्याला माहित आहे की फ्लिपकार्ट हे ऍप्लिकेशन हे भारताच सर्वात मोठे शॉपिंग एप्लिकेशन आहे.फोन पे मध्ये आपल्याला वॉलेट ची सुविधा भेटते. त्याचबरोबर आपण मल्टिपल बँक अकाउंट सुद्धा वापर करू शकतो. फोन पे एप्लीकेशन मध्ये मल्टिपल बँक अकाउंट स्विच करून वापरू शकतो. खूप सारे ऑप्शन सुद्धा आपल्याला फोन पे मध्ये वापरायला भेटतात.

फोन पे ची सिक्युरिटी चांगली आहे या आधी फोन पे ने मनी रिक्वेस्ट ऑप्शन दिला होतं पण त्यामध्ये अडचण निर्माण झाली त्यानंतर फोन पे कडून ही सुविधा बंद करण्यात आली. त्याचबरोबर फोन पे च्या कस्टमर केअर सोबत बोलणे खूप सोप आहे कोणतीही व्यक्ती फोन पे हे एप्लीकेशन वापरू शकते. वापरण्यासाठी हे खूप सोप आहे. फोन पे मध्ये मनी ट्रान्सफर करण्यासाठी कुठलेही चार्जेस हे लागत नाही.

2) गुगल पे (Google Pay)

गुगल पे हे एप्लीकेशन सप्टेंबर 2015 मध्ये मार्केटमध्ये आले. जेव्हा गुगल पे मार्केटमध्ये आले तेव्हा याचं नाव तेज (Tez) असे होते. पण नंतर ह्या एप्लीकेशन च नाव बदलून गुगल पे असे करण्यात आले. कंपनीचे मालक हे गुगल स्वतः आहे.

आपल्याला माहिती आहे गुगल ही खूप मोठी कंपनी आहे जी टेक्नॉलॉजीचा सर्व काम करते. गुगल पे मध्ये आपल्याला वॉलेट हे सेक्शन नसतं. गुगल पे ची सिक्युरिटी सुद्धा चांगली आहे. हे एप्लीकेशन वापरन आपल्याला थोड अवघड जाऊ शकत, कारण त्याचं जे इंटरफेस आहे ते अवघड बनवण्यात आल आहे. त्यामुळे गुगल पे समजण्यासाठी थोड कठीण जाऊ शकत.

गुगल पे च्या कस्टमर केअर शी बोलणं हे पण थोडं अवघड आहे. गुगल पे या एप्लीकेशन मधूनच आपण कस्टमर केअर शी बोलू शकतो. या ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला हेल्प अँड सपोर्ट या ऑप्शन वरून मदत घ्यावी लागते. गुगल पे मध्ये आपल्याला मल्टिपल अकाउंट ॲड करण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच आपल्याला मनी ट्रान्सफर करण्याचे कुठलेही चार्जेस गुगल पे मध्ये लागत नाही.

3) पेटीएम (PayTm)

पेटीएम एप्लीकेशन हे ऑगस्ट 2010 मध्ये मार्केट मध्ये आले. ह्या एप्लीकेशन चे निर्माता विजय शेखर शर्मा हे आहे. पेटीएम हे एप्लीकेशन जेव्हा बनवण्यात आलं तेव्हा हे वॉलेट पर्पस साठी बनवल गेलं होतं. पण काही दिवसानंतर हेच एप्लीकेशन पेटीएम बँक म्हणून सुरू करण्यात आले.

यामध्ये आपण पेटीएम वॉलेट पण वापरू शकतो. मल्टिपल अकाउंट स्विच करण्याची सुविधा सुद्धा पेटीएम एप्लीकेशन मध्ये देण्यात आली असून पैसे पाठवणे हे देखील सोपे आहे. पेटीएम मध्ये सिक्युरिटी थोडी कमी आहे. पेटीएम ह्या ॲप्लिकेशन मध्ये कस्टमर केअर शी बोलणे थोडे अवघड जाऊ शकते.

समजा, कधी तुमची फसवणूक झाली किंवा तुमच्या अकाउंट मधून पैसे गेले आणि ते परत मिळवण्यासाठी कस्टमर केअर शी बोलणे यात वेळ जाऊन हे थोडे त्रासदायक होवु शकते.

वरील पूर्ण माहिती बघितल्यानंतर फोन पे, गुगल पे आणि पेटीएम ॲप सुरक्षित आणि वापरायला सोपे आहेत.