SBI गोल्ड लोन माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, विविध योजना | SBI Gold Loan

नमस्कार मित्रांनो, आज आपण SBI च्या गोल्ड लोन (Gold लोन) म्हणजेच सोने तारण कर्ज बद्दल माहिती बघणार आहोत. यात आपण SBI गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया कशी असते, त्याचे फायदे काय आहेत, त्याची पात्रता, व्याजदर या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

SBI Gold Loan in Marathi

मित्रांनो, आपल्या भारत देशात सोन्याला एक अनन्य साधारण महत्व आहे. खास करून सोन्याचे दागिने परिधान करणे म्हणजे आपण आपली संस्कृती मानतो. असे एक ही घर नसेल किंवा एक ही व्यक्ती नसेल जिच्या कडे सोन्याचे दागिने नसतील. पण सुरक्षेच्या दृष्टीने आज काल बरेच जण सोन्याचे दागिने बँकेत लॉकर मध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहीत आहे का बँकेत ठेवलेल्या या दागिन्यांमुळे तुमची एखादी पैश्यांची अडचण ही सुटू शकते. हो मित्रांनो, पैश्यांची अडचण कोणालाही कधीही येऊ शकते. अश्या अडचणीच्या वेळी मग आपण इथून तिथून कर्जावर पैसे घेतो. पण असे न करता तुम्ही बँकेच्या लॉकर मध्ये असलेले सोने अडचणी च्या वेळी वापरू शकता. ते ही गोल्ड लोन च्या स्वरूपात.



मित्रांनो, गोल्ड लोन देणाऱ्या खूप बँका व खाजगी संस्था तुम्हाला मिळतील. पण त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात. पण SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला गोल्ड लोन खूप कमी व्याजदरात व कमीत कमी कागदपत्रांवर मिळू शकते. मित्रांनो, गोल्ड लोन हे एक प्रकारचे सुरक्षित लोन आहे. इथे तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर तुम्हाला कर्जाची रक्कम मिळते. तसेच स्टेट बँक आपल्या देशातील सर्वात मोठा कर्जदाता आहे. त्यामुळे SBI आपल्याला एक निर्दोष सोने कर्ज सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे तुम्हाला ही जर पैश्याची अडचण सोडवायची असेल तर SBI गोल्ड लोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. SBI गोल्ड लोन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

SBI बँक गोल्ड लोन ठळक बाबी

व्याज दर (Interest Rate)7.30% पासून पुढे
लोन रक्कम मर्यादा20,000 ते 50 लाख पर्यंत
कार्यकाळ3 वर्षापर्यंत
प्रोसेस चार्जेस0.50% कर्ज रक्कमेच्या + GST किंवा 500रू + GST

SBI गोल्ड लोनसाठी पात्रता निकष

Eligibility Criteria for SBI Bank Gold loan

मित्रांनो, तुम्हाला जर SBI तुन गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला लोन साठी अर्ज करण्या आधी काही महत्त्वाचे पात्रता निकष माहीत असणे आवश्यक असते. जसे की…



  • स्टेट बँकेतील लोन घेण्यासाठी तुमचे वय 18 वर्षां पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • लोन घेणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक किंवा रहिवासी असायला हवा.
  • तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा देण्याची आवश्यकता नाही पण तुमच्या कडे उत्पन्नाचा एक निश्चित स्रोत असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे सोने/सोन्याचे दागिने पाहिजेत, बँक सोन्याची गुणवत्ता आणि प्रमाणाची पडताळणी करते.

SBI गोल्ड लोनच्या विविध योजना

SBI Bank Gold Loan Schemes

मित्रांनो, एसबीआय गोल्ड लोन च्या मुख्यत्वे तीन प्रकारच्या योजना आहेत. SBI गोल्ड लोन, SBI लिक्विड गोल्ड लोन, SBI बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन. या सर्व योजना बद्दल माहिती जाणून घेऊ या…

1) SBI गोल्ड लोन

मित्रांनो, सोन्याच्या दागिन्यांवर पैसे देणारी एसबीआय ची ही पहिली योजना आहे. या योजनेत तुम्ही जमा केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य काढून एकूण मूल्याच्या 75% रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून दिली जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही जमा केलेल्या दागिन्यांचे एकूण मूल्य 1,00,000 रुपये झाले असेल, तर त्यापैकी तुम्हाला 75% रक्कम म्हणजे 75,000 रुपये कर्ज म्हणून दिले जातील. उर्वरित रक्कम ही मार्जिन म्हणून ओळखली जाते.

तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 36 महिने म्हणजे तीन वर्ष पर्यंत कालावधी दिला जातो. यात तुम्हाला कमीत कमी 20,000 रुपये व जास्तीत जास्त 20 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. व या योजनेत व्याजदर हा 7.50 % इतका आकारला जातो. या योजने साठी अप्लाय करताना तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावी लागते जी तुमच्या कर्जाच्या रकमेच्या 0.50% + GST इतकी आहे.

2) SBI लिक्विड गोल्ड लोन

मित्रांनो, या योजनेत तुम्ही जमा केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची मूल्यानुसार तुमच्या खात्यात एक निश्चित रक्कम दिली जाते. आणि यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जेवढी रक्कम आवश्यक आहे तेवढ्याच रकमेवर तुम्हाला व्याज द्यावे लागेल. उदाहरणार्थ, समजा बँकेने दिलेल्या 5 लाख रकमेतून तुम्हाला फक्त 2 लाख रुपयेची आवश्यकता आहे तर तुम्हाला फक्त त्याच रकमेवर व्याज द्यावे लागेल. शिवाय प्रोसेसिंग फी म्हणून एकूण कर्जाच्या रकमेवर 0.50% आणि GST किंवा रू 500 आणि GST यापैकी जे जास्त असेल तितकी रक्कम तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून द्यावी लागेल.

या योजनेत ही तुम्हाला कमीत कमी 20,000 रू, तर जास्तीत जास्त 20 लाख रू इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. आणि यावर व्याजदर हा 7.50 % इतका आकारला जाईल. या योजनेत कर्ज परतफेड कालावधी हा 36 महिन्यांचा म्हणजेच 3 वर्षांचा असतो.

3) SBI बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन

मित्रांनो, या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे जर तुम्ही मुदतीपूर्वी कर्जाची पूर्ण रक्कम भरली तर तुमच्या कडून फक्त तेवढ्याच कालावधीसाठी व्याजदर आकारला जाईल. म्हणजे समजा तुम्ही 50,000 रुपये एक वर्षाच्या कालावधी साठी कर्ज म्हणून घेतले. आणि जर तुम्हाला कर्जाची पूर्ण रक्कम सहा महिन्यात भरून टाकायची आहे, तर तुमच्या कडून फक्त सहा महिन्यांचा व्याजदर आकारला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ता योजनेत कर्ज परतफेड कालावधी हा 36 महिन्या वरून 12 महिने करण्यात आला आहे. म्हणजे या योजनेत, कर्ज परतफेड कालावधी हा कमाल 12 महिन्यांवर निश्चित केला आहे.

या योजनेत ही किमान कर्जाची रक्कम 20,000 रुपये असून कमाल कर्जाची रक्कम ही 20 लाख रुपये पर्यंत आहे. यात ही कर्जाच्या एकूण रकमेवर 7.50% इतका व्याजदर आकारला जातो. आणि प्रोसेसिंग फी म्हणून कर्जाच्या रकमेच्या 0.50% + GST किंवा रू 500 आणि GST यापैकी जे जास्त असेल तेवढी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारली जाईल.

SBI गोल्ड लोन घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात:-

Documents Required for SBI Gold Loan

मित्रांनो, इथे तुम्हाला काही कागदपत्रे ही कर्जासाठी अर्ज करताना व काही कागदपत्रे कर्ज वाटपाच्या वेळी सादर करावी लागतात. जसे की..
गोल्ड लोन साठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे…

  • योग्य रित्या भरलेला व तुमच्या स्वाक्षरी असलेला गोल्ड लोन अर्ज.
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा मतदार कार्ड)
  • पत्त्याचा पुरावा ( लाइट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा टेलिफोन बिल)

कर्ज वाटप करताना लागणारी कागदपत्रे

डीपी नोट, डीपी नोट चे वितरण, व्यवस्था पत्र

SBI गोल्ड लोनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

मित्रांनो, SBI गोल्ड लोन घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना तुम्हाला SBI च्या ऑफिशियल वेब साईट वर जाऊन फॉर्म भरून द्यावा लागेल. त्यात तुमचे सर्व डिटेल्स भरून दिल्या नंतर SBI चे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन आवश्यक कागदपत्रे व सोन्याचे दागिने घेण्यासाठी येतील. सर्व कागदपत्रे व सोन्याच्या वस्तू पडताळून मगच बँक तुम्हाला लोन मंजूर करते.

तर, ऑफलाईन अर्ज करन्यासाठी तुम्हाला जवळच्या SBI ब्रांच मध्ये जाऊन गोल्ड लोन साठी अर्ज भरून द्यावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन करून झाल्या वर बँक तुम्हाला कर्ज मंजूर करेल.

याशिवाय तुम्ही YONO अँप द्वारे सुद्धा SBI मध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. ग्राहकांना त्रासमुक्त कर्ज प्रक्रिया देण्यासाठी SBI ने YONO अँप वापरण्याची परवानगी दिली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या अँप द्वारे गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यास ग्राहकांना कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही.

SBI गोल्ड लोन ची परतफेड कशी करता येईल

मित्रांनो एसबीआय गोल्ड लोनची कर्ज परतफेड करण्यासाठी तुम्हाला 36 महिन्याचा कालावधी दिला जातो यात तुम्ही EMI द्वारेही कर्ज परतफेड करू शकता कर्ज वाटप झाल्यानंतर दुसऱ्या महिन्या पासूनच तुमचा EMI सुरू होतो. या शिवाय तुम्ही तुमचा ईएमआय ऑनलाईन पद्धतीने ही भरू शकतात यात कर्ज वाटपाच्या वेळी बँक तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड असलेले खाते देते. याचा उपयोग करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ईएमआय भरू शकतात. तसेच ही रक्कम तुम्ही रोख, चेक द्वारे किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे सुद्धा भरू शकता.

SBI गोल्ड लोन चे स्टेटमेंट कसे चेक करायचे

मित्रांनो, SBI गोल्ड लोन घेतल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गोल्ड लोन संबंधित काही चेक करायचे असेल तर तुम्ही SBI च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुमच्या खात्यात लॉग इन करून कर्जाशी संबंधित सर्व तपशील जसे की थकबाकी, क्रेडिट आणि डेबिट ची रक्कम, वगैरे गोष्टीचे अपडेट्स बघू शकता. तसेच ते स्टेटमेंट डाउनलोड ही करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण SBI गोल्ड लोन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरील दिलेली सर्व माहिती वेळे नुसार बदलू शकते. त्यामुळे लोन घेण्याआधी बँकेत चौकशी करून खात्री करून घेणे फायद्याचे ठरेल. तसेच आमचा हा लेख आवडला असल्यास किंवा महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद

FAQ

SBI बँकेतून गोल्ड लोन घेण्यात SBI मध्ये आपले खाते असणे आवश्यक आहे का?

नाही. तुमचे SBi बँकेत खाते नसेल तरीही तुम्ही SBI मधून गोल्ड लोन घेऊ शकता.

SBI गोल्ड लोन घेण्यासाठी किती वेळ लागतो?

मित्रांनो, SBI मध्ये गोल्ड लोन ची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी जवळ पास एक तास लागू शकतो.

SBI गोल्ड लोन ची कर्जाची रक्कम वेळेत न भरल्यास काय होईल?

मित्रांनो, तुम्ही जर लोन ची रक्कम वेळेत न भरल्यास बँक तुमचे सोने परस्पर विकू शकते.

SBI गोल्ड लोन मध्ये इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर किती आहे?

मित्रांनो, SBI गोल्ड लोन चा इंटरेस्ट रेट हा 7.50% इतका आकारला जातो.