SBI क्रेडिट कार्ड रिफंड प्रोसेस | SBI Credit Card Refund Process in Marathi
आज आपण SBI क्रेडिट कार्ड रिफंड प्रोसेस कशी आहे ते बघणार आहोत. पण त्याआधी क्रेडिट कार्ड बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया, क्रेडिट कार्ड बँकेकडून मिळणारे एक प्लास्टिकचे कार्ड आहे जे डेबिट कार्ड पेक्षा वेगळे आहे. क्रेडिट कार्ड चा मदतीने आपण महिनाभर बँकेचा पैशांचा वापर करू शकतो व महिन्यानंतर ते पैसे बँकेला परत करावे लागतात. थोडक्यात क्रेडीट कार्ड च्या स्वरुपात बँक आपल्याला महिनाभर आपल्या वापरासाठी पैसे उधार देते व महिना झाल्यानंतर आपल्याला ते पैसे बँकेला जमा करावे लागतात. जर आपण ते पैसे बँकेने दिलेल्या तारखेपर्यंत नाही देऊ शकलो तर त्या रक्कमेवर व्याज लागायला सुरुवात होते.
समजा तुमच्या SBI क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट हे तुमच्या आलेल्या बिल अमाऊंट पेक्षा जास्त केलं असेल आणि ते तुम्हाला रिफंड करायचं असेल तर ते कशा प्रकारे करावे हे आज बघूया. उदाहरणार्थ. तुम्हाला जर बिल हे दहा हजार आले असेल आणि चुकून तुमच्याकडून ते बारा हजार भरले गेले असतील तर वरचे पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये रिफंड कसे करायचे आहे ते बघूया,
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला SBI कार्ड चे एप्लीकेशन ऑन करायचे आहे.
स्टेप 2: वरच्या डाव्या साईडला तुम्हाला तीन लाईन दिसतील त्या लाईन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला SERVICE या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर SBI कार्ड चे जे सर्विस आहे ते येतील.
स्टेप 4: तुम्हाला आता CREDIT BALANCE REFUND या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आता तुम्ही जेवढे पेमेंट हे एक्सट्रा केलेले आहे ते तुम्हाला दिसेल.
स्टेप 5: आता जेवढे तुम्हाला रिफंड पाहिजे आहे तेवढी अमाऊंट टाकायची आहे. अमाऊंट टाकल्यानंतर तुम्हाला CONTINUE या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6: तुम्हाला आता कारण विचारलं जाईल की काय कारण आहे की तुम्हाला रिफंड पाहिजे आहे. तुम्हाला तिथे EXCESS MULTIPLE PAYMENT या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: त्याखाली एक बॉक्स आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला CONTINUE या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आता तुम्हाला जा बँकेत रिफंड पाहिजे आहे ती बँक तुम्हाला ऍड करायची आहे. त्यासाठी ADD NEW BANK DETAILS या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर CONTINUE या ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप 9: पुढच्या पेजवर तुमचं नाव ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्याच खाली पुन्हा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. व नंतर IFCS कोड हा टाकायचा आहे.
स्टेप 10: IFCS कोड टाकल्यानंतर त्याच्यासमोर सर्च ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सर्च केलं तर तुमच्या बँकेची मुख्य शाखा आहे ती येईल. त्यानंतर त्याच्या खाली जो बॉक्स आहे त्यावर क्लिक करून TERM AND CONDITIONS एक्सेप्ट करावे आणि CONTINUE या ऑप्शन वर क्लिक करावे.
स्टेप 11: बँकेत जो नंबर रजिस्टर केला आहे त्या नंबर वर तुम्हाला एक ओटीपी देण्यात येईल तो ओटीपी तुम्ही इथे टाकायचा आहे आणि SUMBIT हे ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
या पद्धतीने तुम्ही तुमच्या SBI क्रेडिट कार्डचे जास्त पेमेंट केलेले बिल रिफंड म्हणून तुमच्या खात्यामध्ये परत येईल.