e-SIM (ई-सिम) माहिती | e-SIM information in Marathi

जेव्हा आपण एखादा फोन खरेदी करतो, तेव्हा त्या मोबाईल मध्ये सिम कार्ड हे आपण टाकतो. सिम कार्ड नसेल तर आपण कोणाला कॉल पण करू शकत नाही, मेसेज करू शकत नाही किंवा आपण त्यावर इंटरनेटची सेवा पण घेऊ शकत नाही. पण आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले की आता मोबाईल मध्ये सिम कार्ड टाकण्याची गरज नाहीये. कारण मोबाईल मध्येच पहिले e-SIM हे स्थापित केलेले असते. जे हुबेहूब फिजिकल सिम कार्ड प्रमाणे काम करेल. आता ई-सिम काय आहे? आणि ते कशा प्रकारे काम करते? आणि हे सिम ऍक्टिव्हेट कसं करायचं? ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत.

e-SIM information in Marathi

सर्वात पहिले आपण मिनी सिम कार्ड वापरत होतो. नंतर जशी वेळ गेली तसेच सिम कार्ड चा आकार देखील छोटा होत गेला. आणि नंतर मिनी सिम ते मायक्रो सिम आणि नंतर नॅनो सिम असा ट्रेंड चालू झाला. पण आता नॅनो सिम चा शॉर्टफॉर्म म्हणजेच ई-सीम कार्ड आले आहे. जे व्हर्च्युअल सिमकार्ड आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आकारा सोबत सिम कार्ड चे तंत्रज्ञान पूर्णपणे बदललेले आहे. आणि फिजिकल सिम कार्ड आता भूतकाळ होईल.आत्ताच युग हे व्हर्च्युअल सिम कार्ड च आहे. म्हणजे ई-सिम हे नवीन तंत्रज्ञान आहे. आणि हे वापरायला देखील सोपे आहे. ई-सीम चा अर्थ आहे Embedded Sim (एम्बेडेड सिम). म्हणजेच Embedded Subscriber Identity Module. हे एक व्हर्च्युअल सिम कार्ड आहे, जे एका चिप च्या स्वरूपात फोन मध्ये एम्बेड असते. म्हणजे ते फोनच्या आत जोडलेले असते किंवा तो एक फोनचाच भाग असतो, की तो आपण फोन मधून वेगळा करू शकत नाही. आणि ई-सीम हे एक व्हर्च्युअल सिमकार्ड आहे आणि ते सॉफ्टवेअरच्या मदतीने काम करते.

सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ई-सिमकार्ड हे फोनच्या इंटरनल स्टोरेज सारख आहे. ज्यामध्ये तुम्ही कोणताही डेटा राईट करू शकता आणि त्यासोबत सोबतच हे फोन मध्येच इन्स्टॉल केलेले असते. तुम्ही याला एका फोन मधून काढून दुसऱ्या फोनमध्ये नाही टाकू शकत. परंतु जर तुम्ही तुमचा फोन विकणार असाल, तर त्यामध्ये असलेला ई-सिम असलेला नंबर तुम्हाला डीऍक्टिव्ह करून तुम्ही तो दुसऱ्या फोनमध्ये ऍक्टिव्ह करू शकता. आणि तुम्ही ई-सिम कार्ड कोणत्याही नेटवर्क ऑपरेटर सोबत कॉन्फिगर केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही ई-सीम युक्त फोन खरेदी करता तेव्हा त्यामध्ये असलेले ई-सीम हे पूर्ण रिकामे असते. ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला सर्विस प्रोव्हाइडर (Airtel, Jio) यांना संपर्क करावा लागतो. ते तुम्हाला एक QR कोड देता आणि कोड स्कॅन झाला की तुमचा फोन मध्ये असलेले ई-सीम हे ऍक्टिव्हेट होते. आणि तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. ई-सिम ऍक्टिव्ह करण्याच्या प्रोसेस ला दोन तास लागतात.

भारतामध्ये आता फक्त एअरटेल आणि जिओ हेच दोन सर्विस प्रोव्हायडर आहे, जे ई-सिम सेवा उपलब्ध करतात. जर तुम्ही Airtel किंवा Jio चे ग्राहक नसाल तर तुम्हाला तुमचा नंबर Airtel किंवा Jio मध्ये पोर्ट करावं लागेल. तेव्हा तुम्ही ई-सीम या सेवेचा लाभ घेऊ शकता.ई-सिम कार्ड ला ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस काय आहे? आणि त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील? यासाठी Airtel आणि Jio या दोन्हींच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्या पुढील प्रमाणे:-

Airtel चे ई-सिम कसे ऍक्टिव्ह करावे?

How to activate eSim on Airtel

जर तुम्ही Airtel चे ग्राहक असाल आणि तुम्ही तुमच्या नंबर ला ई-सीम मध्ये करायचं असेल तर तुम्ही e-SIM <space> Registered Email ID टाईप करा आणि 121 वर पाठवा.

उदाहरणार्थ, तुमचा ई-मेल आयडी [email protected] असा असेल, e-SIM [email protected] टाईप करा आणि 121 वर पाठवा.

तुम्ही मेसेज पाठवल्या नंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज येईल. ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल कि तुम्हाला तुमचे फिजिकल सिम कार्ड हे ई-सीम मध्ये बदलायचे आहे का? उत्तरा तुम्हाला 1 पाठवावा लागेल ज्याचा अर्थ होय असा होतो.

आणि हे उत्तर तुम्हाला 60 सेकंदामध्ये द्यायचे आहे. कारण 60 सेकंदानंतर तुमचा मेसेज हा एक्सपायर होईल.

त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी वर एक मेल येईल, ज्यामध्ये तुम्हाला एक QR कोड मिळेल. तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून तुमचे ई-सीम हे ऍक्टिव्हेट करायचे आहे. पण हे करायचे कसे?

जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जायचं आहे. आणि Mobile Data वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर Add Data Plan या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आणि शेवटी Scan QR code वर क्लिक करून कॅमेरा च्या सहाय्याने QR कोड हा स्कॅन करायचा आहे.

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरतात तर तुम्ही तुमच्या फोनच्या Settings मध्ये जायचंय. नंतर Network & Internet>Mobile Network>Advanced>Carrier नंतर Add Carrier वर क्लिक करायचं आणि शेवटी Scan QR code वर क्लिक करून कॅमेरा च्या साह्याने QR code स्कॅन करायचा.

Jio चे ई-सीम कसे ऍक्टिव्हेट करावे?

How to activate eSim on Jio

जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर, तुम्ही तुमचा इ-सिम असलेला फोन घेऊन जवळच्या जिओ स्टोअर मध्ये किंवा Reliance Digital Outlet वर जा आणि तिथे तुमचा CAF फॉर्म भरून सबमिट करा.

फॉर्ममध्ये तुमचा जिओ नंबर आणि फोनचा IMEI नंबर लिहा. कारण तो नंबर तिथे आवश्यक आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर जिओ चे कार्यकारी अधिकारी तो फॉर्म चेक करतील आणि तुम्ही दिलेल्या डिटेल्स हे व्हेरिफाय करतील.

त्यानंतर POS (Point of sale) मशीन द्वारे एक QR कोड तयार करतील हा QR कोड तुमच्या फोनवरून स्कॅन केला जाईल आणि त्यानंतर तुमचे ई-सीम हे ॲक्टिव होईल.

ई-सीम चे फायदे

Benefits of eSim

ई-सीम ला भविष्यातील तंत्रज्ञान म्हटले तरी चालेल, कारण येत्या काळात प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ई-सीम दिसणार आहे. ई-सीम चे अनेक फायदे आहे.

स्पेस सेवींग (Space Saving) – ई-सीम मुळे डिवाइस मध्ये वेगळा सिमकार्ड ट्रे नाही. यामुळे जागा वाचते आणि ही उरलेली जागा इतर महत्त्वाच्या घटकांसाठी वापरली जाऊ शकते.

अँटी थेफ्ट (Anti Theft) – ई-सीम कार्ड चा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते हरवले किंवा चोरीला जाऊ शकत नाही. आणि समजा फोन चोरीला जरी गेला तरी चोर फोन मधून सिम कार्ड काढू शकत नाही. आणि म्हणूनच चोराला पकडणे सोपे आहे.

कमी बॅटरी वापर (Less Battery Consumption) – ई-सीम सॉफ्टवेअरच्या मदतीने कार्य करते. म्हणूनच ते फिजिकल सिम कार्ड पेक्षा कमी बॅटरी वापरते.

नेटवर्क स्विचींग (Network Switching) – ई-सीम च्या मदतीने सर्विस प्रोव्हायडर बदलने देखील सोपे आहे. जर तुम्ही एअरटेल चे ग्राहक असेल आणि जिओची सर्विस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा नंबर न बदलता व सिम कार्ड न बदलता जिओच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

प्रवाशांसाठी सर्वोत्तम (Best For Travelers) – भारतात आणि परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ई-सीम वरदाना पेक्षा कमी नाहीये. कारण यामुळे प्रवाशांना रोमिंग चार्जेस पासून वाचवले जाते.

उत्तम सुरक्षा (Better Security) – तज्ञांच्या मते ई-सीम हे फिजिकल सिम पेक्षा जास्त सुरक्षित आहे. आपण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ई-सीम हा एक चांगला पर्याय आहे.

ई-सीम सपोर्टेड मोबाईल फोन:-

eSim Supported Mobile Phone

  1. iPhone XR
  2. iPhone 13 Pro Max
  3. Samsung Galaxy S20
  4. Huawei P40
  5. Motorola Raze 2019
  6. Oppo Reno 5A
  7. Gemini PDA
  8. Oppo Reno6 Pro 5G