बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड: अप्लाय कसे करायचे, चार्जेस, कागदपत्रे | Bajaj Finserv EMI Card
नमस्कार मित्रांनो, आज आपण बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड (Bajaj Finserv EMI card ) साठी अप्लाय कसे करायचे, त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, शॉपिंग करायला कोणाला आवडत नाही, प्रत्येकालाच शॉपिंग करायला आवडत. पण पैसे कमी असल्याने तुम्ही वस्तू खरेदी करणे टाळता का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर मित्रांनो, असे करू नका. कारण आता तुम्ही अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट एलईडी टीव्ही, लॅपटॉप, एसी, कॉम्प्युटर इत्यादी सर्व वस्तू बजाज ईएमआय कार्ड द्वारे हप्त्यांवर खरेदी करू शकता. मित्रांनो, पूर्वीच्या काळी आपण वस्तू खरेदी करताना रोख पैसे द्यायचो. पण आता परिस्थिती बदलली आहे. अनेक जण पैश्यांची अडचण आहे म्हणून किंवा इतर काही कारणांमुळे हप्त्याने एखादी वस्तू खरेदी करतात. आणि नंतर ईएमआई च्या रुपात हळूहळू पैसे भरतात. जेणेकरून स्वतः वर आर्थिक अडचण येऊ नये. मित्रांनो, यासाठी तुम्ही बजाज ईएमआई कार्ड चा वापर करू शकता. हो मित्रांनो, बजाज ईएमआय कार्ड हे एक क्रेडिट कार्ड सारखेच आहे. जे तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार व्यवहाराची मर्यादा देते. म्हणजे तुम्ही ईएमआई वर 50 ते 60 हजार रुपये पर्यंत ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि दर महिन्याला हप्त्यांमध्ये ईएमआई भरू शकता. मुख्य म्हणजे यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. याच बजाज ईएमआय कार्ड बद्दल अजून काही माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
सर्वात पहिले बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड म्हणजे काय आहे ते जाणून घेऊ या
बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड म्हणजे काय ?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड हे खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे एक डिजिटल कार्ड आहे. जे तुम्हाला सर्वात मोठी खरेदी करण्यास मदत करते. अगदी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टेलिव्हिजनपासून ते फर्निचरपर्यंत, तसेच जीवनावश्यक उत्पादने आणि तुमच्या आवडीच्या सर्व मोठ्या वस्तू खरेदीसाठी, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड तुम्हाला उपयोगी पडणारे कार्ड आहे. या कार्ड द्वारे तुम्ही बजाज च्या पार्टनर स्टोअर मधून तुमच्या गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकता. आणि यात 3 ते 24 महिन्यांच्या कालावधीत ईएमआई भरू शकता.
बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी किती चार्जेस द्यावे लागतात?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड साठी तुम्हाला एकूण 599 रुपये GST सह द्यावे लागतात. आधी याची फी 530 रुपये इतकी होती. पण आता ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जीएसटी सह एकूण 599 रुपये द्यावे लागणार आहेत. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची अन्युअल फी म्हणजे वार्षिक फी सुद्धा असते. जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात एकदा पण युझ केले नाही तर तुम्हाला 190 रुपये भरावे लागतात. आणि जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात वापरले तर तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागणार नाही.
बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड पात्रता काय आहे व कोण कोणते कागदपत्रे लागतात?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच या कार्डसाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि तुमचे बँक अकाउंट डिटेल्स जे मोबाईल नंबर शी लिंक केलेले असेल.
How to apply for Bajaj Finserv EMI card?
बजाज फिनसर्व्ह EMI कार्डसाठी अप्लाय कसे करायचे
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला www.bajajfinserv.in या वेबसाईटवर जायचे आहे. Shop on EMI मध्ये EMI Card वर क्लिक करायचे आहे.
बजाज फिनसर्व्ह EMI कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट लिंक => bajajfinserv.in/insta-emi-card
स्टेप 2: त्या नंतर होम पेज वर थोडे खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे व थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो दिलेल्या जागी टाकून नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
स्टेप 3: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला पॅन कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव, जन्म तारीख, पॅन कार्ड नंबर आणि तुमचा रेसिडेंशिअल पिन कोड टाकायचा आहे.
(मित्रांनो, इथे पिन कार्ड टाकल्या नंतर तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या एरिया मध्ये या कार्ड ची सर्व्हीस उपलब्ध आहे की नाही. जर नसेल तर तुम्हालाकार्ड साठी अप्लाय करता येणार नाही. व ही प्रोसेस इथेच थांबून जाईल.)
स्टेप 4: मित्रांनो, तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करून तुम्ही कार्डसाठी एलिजीबल म्हणजेच पात्र आहात का ते तपासले जाते. आणि जर एलिजीबल असाल तर तुम्हाला कार्ड वर किती लिमिट पर्यंत कार्ड देण्यात येईल ते सांगितले जाते. व नंतर खाली दिलेल्या Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Digilocker वरून KYC करण्यास सांगितले जाईल. तर त्यासाठी इथे क्लिक करायचे आहे.
व नंतर तुम्ही Digilocker मध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या वरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे. तुम्ही जर आधार कार्ड वरून लॉगिन केले असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व सहा अंकी पिन टाकायचा आहे. व सबमिट करायचे आहे. तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे व नंतर Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
हे हि वाचा: डिजीलॉकर म्हणजे काय, अकाउंट कसे बनवायचे, डॉक्युमेंट ऍड कसे करायचे
स्टेप 6: आता तुम्हाला काही परमिशन विचारले जातील त्याला allow करायचे आहे.
स्टेप 7: मित्रांनो, आता केवायसी साठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट देणार आहात ते विचारले जाईल. तर तुम्ही इथे आधार कार्ड सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर तुमचे आधार कार्ड दाखवले जाईल. त्यात तुमचे नाव, फोटो, निवासी पत्ता वगैरे दाखवले जाते. मित्रांनो जर तुमचा करंट अड्रेस व पर्मनंट अड्रेस वेगवेगळा असेल तर तुम्ही update address ऑप्शन वर क्लिक करून अड्रेस चेंज करू शकता. व नंतर Confirm बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: मित्रांनो, आता तुम्हाला रिलेशनशिप डिटेल्स (किटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव) टाकायचे आहेत. व नंतर Proceed करायचे आहे.
स्टेप 9: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला कार्ड ची पूर्ण Summary दाखवली जाईल. म्हणजे तुम्हाला कार्ड वर किती लिमिट देण्यात आली आहे आणि कार्ड वरून फर्स्ट ट्रांझेंक्शन किती रुपयांचे करू शकता ते दाखवले जाईल. त्याखाली तुम्ही हे कार्ड कुठे कुठे वापरू शकता ते दाखवले जाईल.
मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला पेमेंट चा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला एकूण 599 रुपये पे करायचे आहेत. तर तुम्हाला इथे Pay Now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: आता तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्ट करायचे आहे. इथे तुम्ही यूपीआई, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकता. तर इथे पेमेंट मोड सिलेक्ट करून रू 599 पे करायचे आहेत.
स्टेप 11: मित्रांनो, आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला View now आणि Activate now असे दोन ऑप्शन दिसतील. यात view now मध्ये तुम्ही तुमचे कार्ड बघू शकता. आणि activate now ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचे कार्ड ऍक्टिव्हेत करायचे आहे.
इथे आपण activate now ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला e-mandate पूर्ण करायचे आहे. (e mandate म्हणजे समज तुम्ही बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड वरून हप्त्यांवर एक मोबाईल फोन खरेदी केला, आता जो ईएमआई डेबिट होईल त्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट नंबर द्यावे लागेल, जेणेकरून दर महिन्याला त्या अकाउंट मधून ईएमआई डेबिट होईल. त्यालाच e mandate असे म्हणतात)
स्टेप 12: मित्रांनो, e- mandate पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आता नेक्स्ट पेज वर तुमचा बँक नाव, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड टाकून अकाउंट टाइप म्हणजेच सेविंग आहे की करंट अकाउंट आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्या नंतर तुम्ही e-mandate रेजिस्ट्रेशन कशाने पूर्ण करणार आहात, ते सिलेक्ट करायचे आहे. म्हणजेच मोबाईल ओटीपी द्वारे की डेबिट कार्ड द्वारे ते सिलेक्ट करायचे आहे. व शेवटी Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 13: मित्रांनो, नेक्स्ट पेज वर तुम्हाला बजाज फिनसर्व्ह कार्ड चे डिटेल्स दाखवले जातील व त्यात सर्वात खाली तुम्हाला व्हेरिफाय करण्यासाठी दोन ऑप्शन दिले आहेत Debit card आणि Net Banking. इथे आपण डेबिट कार्ड ऑप्शन सिलेक्ट करू या. त्या नंतर खाली दिलेले टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
तर मित्रांनो, आता तुमचे e- mandate पूर्ण होऊन जाईल. व अश्या प्रकारे तुमचे बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड अप्रुव्ह होऊन ऍक्टिव्हेट होऊन जाईल.
बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड कसे आणि कुठे वापरायचे
समजा तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची आहे, अशा वेळी तुम्ही तुमचे प्रॉडक्ट तुमच्या आवडत्या शॉपिंग वेबसाइट (ऍमेझॉन, फ्लिपकार्ट…) मधून निवडायचे आहे आणि चेकऊट EMI ऑपशन निवडून या कार्ड चे डिटेल्स टाकायचे आणि अशा तर्हेने तुम्ही महागाची वस्तू ऑनलाईन EMI वर घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ऑफलाईन शॉपिंग करायची असेल तर दुकानदाराला सांगा कि माझ्याकडे बजाज फिनसर्व्ह ईमआय कार्ड आहे, दुकानदार त्याला नेमून दिलेल्या बजाज एजन्ट ला बोलावून तुमच्या वस्तू ला EMI मध्ये करून देईल.
FAQ
बजाज फायनान्स इएमआई कार्ड ची मर्यादा किती आहे?
मित्रांनो, बजाज फायनान्स इएमआई कार्ड वर तुमच्या सिबील (CIBIL) स्कोर नुसार मर्यादा दिली जाते.
बजाज फायनान्स कार्ड काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?
मित्रांनो, बजाज फायनान्स कार्ड साठी रू 530 भरावे लागतात. नंतरच कार्ड ऍक्टिव्हेट केले जाते.
शॉपिंग साठी बजाज कार्ड वापरता येते का?
मित्रांनो, तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही नेटवर्क स्टोअर मध्ये बजाज फायनान्स ईएमआई कार्ड वापरू शकता. तसेच अनेक पार्टनर स्टोअर्स मध्ये मुख्य ब्रँड वेबसाइट्स व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. मित्रांनो, एवढेच नाही तर तुम्हाला अनेक प्रॉडक्ट्स वर नो कॉस्ट EMI चा लाभ देखील मिळतो.
बजाज फायनान्स ईएमआई कार्ड मधून पैसे काढता येऊ शकते का?
नाही मित्रांनो, तुम्ही तुमचे बजाज फायनान्स ईएमआई कार्ड वापरून एटीएम मधून पैसे काढू शकणार नाही.
विद्यार्थी बजाज फायनान्स ईएमआई कार्डसाठी अर्ज करू शकता का?
मित्रांनो, जर तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमची बजाज EMI कार्ड साठी पात्रता तपासून बजाज कार्डसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
एकदा बजाज फिनसर्व्ह कार्ड ऍक्टिव्हेट केल्यावर लगेच फ्लिपकार्ट किंवा ऍमेझॉन वरून ऑनलाईन शॉपिंग करू शकतो का?
नाही मित्रांनो, कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यावर तुम्हाला सर्वात आधी एखाद्या ऑफलाईन स्टोअर मध्ये जाऊन ट्रांझेक्शन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. जसे की तुमचे बँक डिटेल्स, पासबुक चे फोटो कॉपी, आधार कार्ड, वगैरे. डॉक्युमेंट देऊन मग तुमचे कार्ड पूर्णपणे ऍक्टिव्हेट होऊन जाईल
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण बजाज फायनान्स इएमआई कार्ड साठी अप्लाय कसे करायचे या बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
Tags: Bajaj Finserv EMI Card Tayar Kase Karayche, Bajaj Finserv EMI Card che fayde kay ahet, Bajaj Finserv EMI Card Konala Bhetate, Bajaj EMI Card Mhanje Kay, Bajaj Finserv EMI Card Kothe Milte, Bajaj Finserv EMI Card La Apply Kase Karayche, Bajaj Finserv EMI Card Varun Shopping Kashi karayche