क्रेडिट कार्ड मधील बिलिंग डेट, ड्यु डेट, अनबिल अमाउंट, मिनिमम ड्यु अमाउंट म्हणजे काय?
नमस्कार मित्रानो, आज आपण क्रेडिट कार्ड मधील बिलिंग डेट, ड्यु डेट, अनबिल अमाउंट, मिनिमम ड्यु अमाउंट म्हणजे काय याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेऊ या.
मित्रांनो, क्रेडिट कार्डचे महत्व आणि उपयोग आपल्या सर्वांना माहीतच आहेत. खरंतर क्रेडिट कार्ड हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण अगदी ऑनलाईन स्टोअर पासून ते जवळच्या एखाद्या रिटेल दुकानापर्यंत आपण ते सर्वत्र वापरतो. अनेक जण म्हणतात की क्रेडिट कार्ड वापरणे खूप सोपे आहे, पण मित्रांनो, तुम्हाला जर क्रेडिट कार्ड बद्दल बेसिक माहिती असेल तरच क्रेडिट कार्ड वापरणे सोपे जाते. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. क्रेडिट कार्डच्या बेसिक माहिती मध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड बिल डेट म्हणजे काय असते, बिल ड्यु डेट म्हणजे काय असतं, अनबिल अमाउंट , मिनिमम ड्यु अमाउंट वगैरे म्हणजे काय असतं या अश्या सर्व गोष्टीं बद्दल माहिती असणे खूप आवश्यक असते. त्यामुळे तुम्हाला ही जर या गोष्टीं बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा…
मित्रांनो, क्रेडिट कार्डच्या 5 गोष्टी आहेत ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे. त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत हे जाणून घेऊ या.
Bill Date किंवा बिलिंग सायकल
मित्रांनो, तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंटची मागील शेवटची तारीख व तुमच्या पुढच्या स्टेटमेंटची तारीख या मधील कालावधीला क्रेडिट कार्ड चे बिलिंग सायकल असे म्हणतात. आणि तुमचे क्रेडिट कार्ड चे स्टेटमेंट ज्या तारखेला तयार होते त्या तारखेला बिल डेट असे म्हटले जाते. ही तारीख ही फिक्स असते, तुमचे दर महिन्याचे स्टेटमेंट याच फिक्स डेट ला जनरेट होते. जसे की समजा, तुमच्या कडे hdfc बँक चे क्रेडिट कार्ड आहे. आणि या क्रेडिट कार्ड चे बिल दर महिन्याच्या 15 तारखेला जनरेट होत असेल , तर ही 15 तारीख या क्रेडिट कार्ड ची बिल डेट असेल. एकदा का तुमचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट झाले की, लगेच पहिल्या दिवसापासून तुमचे सर्व ट्रांझेशन्स व केलेले खर्च क्रेडिट कार्ड बिल मध्ये ऍड केले जातात. तसेच तुम्ही जर क्रेडिट कार्ड मधून पैसे काढले तरी पैसे काढण्याची फी सुद्धा या बिलमध्ये समाविष्ट केली जाते.
क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल कसे काम करते ते एका उदाहरण द्वारे आपण समजून घेऊ या.
समजा, तुमचे क्रेडिट कार्ड चे स्टेटमेंट प्रत्येक महीन्याच्या 5 तारखेला तयार केले जाते. मग आता, तुमचे क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल मागील महिन्याच्या 6 तारखे पासून ते चालू महिन्याच्या 5 तारखे पर्यंत असेल. आणि या कालावधीत तुम्ही केलेले सर्व व्यवहार व खर्च तुमच्या या महिन्याच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये दाखवले जातील.
मित्रांनो, क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल ही शक्यतो 27 ते 31 दिवसांपर्यंत असू शकते. खरंतर तुमच्या कडे कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे व क्रेडिट कार्डचा प्रकार काय आहे, यावर ही सायकल किती दिवसांची असेल ते ठरते. तुमच्या क्रेडिट कार्ड शी संबंधित असलेल्या सर्व तारखांची तुम्हाला माहिती असायला हवी. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा योग्य तो वापर करू शकाल. तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट कार्ड बिल ची तारीख कधी आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ते तुम्ही नेट बँकिंग, फोन बँकिंग, किंवा तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर शी संपर्क करून ही जाणून घेऊ शकता.
Due Date म्हणजे पैसे देण्याची तारीख
मित्रांनो, तुमच्या क्रेडिट कार्ड वर केलेल्या व्यवहाराचे तुम्हाला मंथली पेमेंट करणे आवश्यक असते. आणि हे पेमेंट तुम्हाला दिलेल्या एका विशिष्ट तारखेला करणे बंधनकारक असते. ही तारीख म्हणजेच ड्यु डेट किंवा देय तारीख असते. थोडक्यात सांगायचे झाले तर तुमचे क्रेडिट कार्ड बिल जनरेट झाल्यावर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 दिवसांचा कालावधी दिला जातो. यात पेमेंट करण्याची सर्वात शेवटची तारीख म्हणजे तुमची ड्यु डेट. म्हणजे जसे की, समजा 15 जानेवारीला माझे क्रेडिट कार्ड बिल जनरेट झाले आणि त्यापुढे मला 20 दिवस पेमेंट करण्यासाठी दिले. म्हणजे मला 4 फेब्रुवारी पर्यंत पेमेंट करावे लागेल. ही 4 फेब्रुवारी तारीख म्हणजे माझी ड्यु डेट.
मित्रांनो, या ड्यु डेट पर्यंत जर तुम्ही तुमचे पेमेंट केले नाही तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागतो. त्यामुळे तुमचे क्रेडिट कार्ड चे बिल वेळेवर म्हणजेच ड्यु डेटच्या आधी भरा. तसेच ही ड्यु डेट तुम्हाला तुमच्या मंथली बिलिंग स्टेटमेंट मध्ये बघायला मिळेल. आणि जर तुमच्या कडे तुमचे स्टेटमेंट नसेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या क्रेडिट कार्डच्या कस्टमर केअर नंबर वे कॉल करून तुमची देय तारीख किंवा ड्यु डेट जाणून घेऊ शकता.
Minimum Due Amount म्हणजे किमान देय रक्कम
मित्रांनो, किमान देय रक्कम म्हणजे देय तारखेला किंवा त्या आधी भरावयाची रक्कम असते. साधारणतः ही एककम एकूण थकबाकीची 5% इतकी असते. जर तुमची मागील बिलिंग सायकल मधील न भरलेली शिल्लक रक्कम असेल किंवा तुम्ही क्रेडिट मर्यादा ओलांडलेली असेल तर ती रक्कम ही क्रेडिट कार्ड च्या किमान देय रकमेत जोडली जाते.
Minimum Due Amount ला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, समजा तुमचे या महिन्याचे बिल 50 हजार झाले आहे, तर बँक तुम्हाला पूर्ण बिल न भरता बिलाचे किमान देय भरण्याची संधी देते, म्हणजेच तुम्ही पूर्ण 50 हजार न भरता या रकमेच्या 5% पैसे (2500) भरू शकता आणि बाकीचे पैसे भरण्यासाठी बँक तुम्हाला एक महिना वाढवून देते, आणि राहिलेल्या पैशावर (45000) व्याज आकारते.
मित्रांनो, किमान देय रक्कम भरल्याने तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोर ला फटका बसण्यापासून रोखू शकता. तसेच उशिरा (लेट) पेमेंट शुल्क ही टाळू शकता. आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त एक महिना भेटतो. तेव्हा तुम्ही तुमचे पूर्ण पेमेंट करू शकता. पण मित्रांनो, तुम्ही जर वारंवार किमान देय रक्कम भरत राहिलात तर मात्र तुम्हाला तोटा होऊ शकतो. कारण बरेच जण क्रेडिट कार्ड चे पूर्ण बिल भरण्यापेक्षा फक्त किमान देय रक्कम भरतात. यामुळे जरी तुमच्या क्रेडिट स्कोर ला फटका बसत नसला आणि कोणतेही उशीरा पेमेंट शुल्क नसले तरीही, तुमच्या उर्वरित बिलाच्या रकमेवर दर महिन्याला व्याज आकारले जाते आणि प्रत्येक अतिरिक्त खर्चावर देखील व्याज जमा होते. यामुळे शेवटी तुम्ही कर्जात अडकले जाता. आणि मग तुमच्या क्रेडिट स्कोर ला ही धक्का पोहचू शकतो. आणि यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे फक्त एखाद्या वेळेस तुम्ही किमान देय रक्कम भरू शकता. पण शक्यतो तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड चे पूर्ण बिल भरणेच तुमच्या साठी योग्य ठरेल.
Total Due Amount म्हणजे पूर्ण देय रक्कम
मित्रांनो, तुमच्या बिलिंग सायकल च्या दरम्यान तुमचे जे बिल जनरेट होते, ते बिल म्हणजेच तुमचे टोटल ड्यु अमाउंट होय.
उदाहरण सांगायचे झाले तर समजा, तुमचे क्रेडिट कार्डचे बिल 15 तारखेला जनरेट होते. तर 15 जानेवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंतच्या बिलिंग सायकल मध्ये जे बिल जनरेट झाले आहे, ते बिल म्हणजेच टोटल ड्यु अमाउंट. मित्रांनो, याच जनरेट झालेल्या बिल स्टेटमेंट मध्ये एक टोटल ड्यु अमाउंट व एक मिनिमम ड्यु अमाउंट दिलेली असते. त्यातील टोटल ड्यु अमाउंट भरणे आवश्यक आहे.
Unbilled Amount म्हणजे बिल स्टेटमेंट मध्ये ऍड न झालेली रक्कम
मित्रांनो, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तयार झाल्यानंतर तुम्ही जो काही खर्च करता किंवा जी काही खरेदी करतात ती रक्कम बिल न केलेली रक्कम म्हणून ओळखली जाते. ही बिल न केलेली रक्कम तुमच्या पुढच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वर देय रक्कम म्हणून दर्शविली जाते.
उदाहरण: मित्रांनो, समजा तुमचे बिल 15 तारखेला जनरेट झाले आहे. आणि जर 16 तारखेला तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे रू 15,000 ची खरेदी केली तर याचे बिल पुढील महिन्याच्या बिल स्टेटमेंट मध्ये दाखवले जाईल. तो पर्यंत ही अमाउंट Unbilled Amount म्हणजे बिल न केलेली रक्कम म्हणून ओळखली जाईल.
मित्रांनो तुमची बिल न केलेली रक्कम कमी असेल तर पुढच्या बिल स्टेटमेंट मध्ये भरणे सोपे होते. आणि जर ही रक्कम जास्त असेल तर परतफेड करायला तुम्हाला पुढचे 30 दिवस व नंतर चे 20 दिवस असे एकूण 50 दिवस ही मिळतात. तसेच तुमची बिल न केलेली रक्कम किती आहे ते सुद्धा तुम्ही नेट बँकिंग द्वारे, एसएमएस द्वारे, कस्टमर केअर कॉल द्वारे किंवा तुमच्या बँकेला भेट देऊन ही जाणून घेऊ शकता.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण क्रेडिट कार्डच्या पाच गोष्टी बघितल्या ज्या तुम्हाला माहीत असणे खूप आवश्यक आहे. या पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या किंवा माहित करून घेतल्या तर तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरणे खूप सोपे होऊन जाईल. तसेच आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल किंवा महत्त्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र मंडळीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।
FAQ
क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आहे?
मित्रांनो, क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सर्वात योग्य वेळ ही देय तारखेच्या (Due Date) काही दिवस आधीची आहे. तसेच देय तारखे पर्यंत पूर्ण देय रक्कम (Total Due Amount) किंवा किमान रक्कम (Minimum Due Amount) भरल्याने खाते चांगल्या स्थितीत राहते. आणि तुम्हाला चांगला किंवा उत्कृष्ट क्रेडिट स्कोअर तयार करता येतो. पण लक्षात ठेवा किमान रक्कम भरली तर उर्वरित रक्कमेवर बँक खूप जास्त व्याज लावते.
क्रेडिट कार्ड बिल पूर्ण भरले नाही तर काय होईल?
मित्रांनो, तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड बिल पूर्ण भरले नाही तर तुमच्या शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाते. आणि जर तुम्ही दरवेळेस शिल्लक ठेवत असाल तर व्याज अजून वाढत राहील.
क्रेडिट कार्ड ची बिल डेट बदलू शकतो का?
हो, तुम्ही तुमच्या कार्ड देणाऱ्या बँकेशी संपर्क करून क्रेडिट कार्ड बिल डेट बदलू शकता. पण हि तारीख साधारण पणे एकदाच बदलता येऊ शकते. आणि तारीख बदलाच्या आधी तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड चे पूर्ण पेंडिंग बिल भरावे लागतात.
फक्त किमान देय रक्कम (Minimum Due Amount) भरल्यास व्याज आकारले जाते का?
हो मित्रांनो, किमान देय रक्कम भरल्यास उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाते.
क्रेडिट कार्ड वर फक्त किमान देय रक्कम भरल्यास काय होईल?
मित्रांनो, तुम्ही जर दीर्घ काळ फक्त किमान देय रक्कम भरत राहील्यास, तुम्हाला थकीत रकमेवर जास्त व्याज आकारावे लागेल. तसेच तुमची क्रेडिट मर्यादा देखील तुम्ही परत न केलेल्या रकमेपर्यंत कमी केली जाईल.
Tags: Important Credit Card Terms Explained in Marathi, Minimum Due Amount in Marathi, Minimum Due Amount Mhanje Kay, Minimum Due Amount Calculate Kashi Karaychi, Total Due Amount in Marathi, Total Due Amount Mhanje Kay, Unbilled Amount in Marathi, Unbilled Amount Mhanje Kay, Credit Card Bill Date in Marathi, Bill Cycle in Marathi