GDP म्हणजे काय ? | What GDP in Marathi

तुम्हाला तुमच्या शाळेची वर्षे आठवतात का, शाळेत आपल्याला वर्षातून चार वेळा प्रगती पुस्तक हे दिल जायच. त्यामध्ये पहिली घटक चाचणी, सहामाही परीक्षा, दुसरी घटक चाचणी आणि सर्वात शेवटी वार्षिक परीक्षा नंतर निकाल लागायचा. वर्षभरात तुम्ही काय बरीवाईट कामगिरी केली हे त्या प्रगती पुस्तकावरून समजायचं. अगदी हीच कामगिरी देशासाठी GDP चे आकडे करता.

What GDP in Marathi

केंद्रीय सांख्यिकी संस्था वर्षातून चार वेळा देशाचा GDP मोजतात. GDP म्हणजेच Gross Domestic Product मराठीत याला सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर एका देशामध्ये ठराविक कालावधी मध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा यांचा उत्पादनाचा एकूण खर्च होय.



समजा एका देशाने एक चेंडू तयार केला या एका चेंडूची किंमत आहे दहा रुपये त्या देशाने एका वर्षात तयार केले, म्हणूनच त्या देशाचा त्या वर्षाचा GDP होईल 10×100 = 1000 रूपये. ठराविक काळात देशात जे काही तयार होते जे विकले जाते किंवा विकत घेतले जाते किंवा ज्याची देवाण-घेवाण केली जाते अशा सगळ्यांचा मिळून GDP तयार होतो.

1935 साली अमेरिके मधले अर्थतज्ञ सायमन कुझनेट्स यांनी पहिल्यांदा असा अमेरिकेचा GDP काढला. आणि त्यानंतर जवळपास सगळ्या देशांनी अशी GDP ची पद्धत स्वीकारली. भारतामध्ये देखील 1950 पासून अर्थव्यवस्थेचा GDP काढला जातो.