बँक संबधीत शब्द आणि त्यांचे अर्थ | Important Banking Terms in Marathi

Banking Terms

डेबिट म्हणजे काय?

What is Debit in Marathi ?

बँकिंग क्षेत्रात डेबिट हा शब्द खूप वेळा वापरला जातो डेबिट म्हणजे बँक अकाउंट मधून पैसे काढणे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या बँक खात्यातून पैसे काढतो तेव्हा या गोष्टीला बँकिंग मध्ये डेबिट असे म्हणतात.क्रेडिट म्हणजे काय?

What is Credit in Marathi ?

क्रेडिट म्हणजे पैसे किंवा वस्तू आणि इतर काही सेवा काही वेळेसाठी उधार घेणे होय. ज्यामध्ये आपण ठरलेल्या वेळेत पैसे परत करतो. बऱ्याच बँका आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था क्रेडिट देतात. सावकार, व्यापारी आणि सेवा प्रदाते एकत्रितपणे क्रेडिट शी निगडीत असतात त्यांच्या विश्वासाच्या आधारे ते आपल्याला पैसे किंवा वस्तू क्रेडिट देतात.

EMI म्हणजे काय?

What is EMI in Marathi ?EMI म्हणजे Equated Monthly Installment होय. म्हणजे आपण जर एक लाख कर्ज घेतलं तर आपल्याला ते हप्त्यांमध्ये भरता येत. जे व्यक्ती जास्त किमतीची वस्तू कॅश पैसे देऊन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी EMI हा ऑप्शन चांगला आहे. किंवा जर आपल्याला लोन घ्यायचे असेल जसे होम लोन, कार लोन अशा प्रकारचे बरेच लोन त्यासाठी EMI ची सुविधा बँकांनी दिलेली आहे. समजा तुम्ही एक लाख कर्ज घेतल्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये याप्रमाणे बँकेत जमा करावे लागेल आणि त्यावर तुम्हाला पाच ते दहा टक्केपर्यंत व्याज सुद्धा द्यावे लागते.