GST म्हणजे काय ? | What is GST in Marathi

GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर (Good & Service Tax). GST लागू झाल्यानंतर प्रत्येक वस्तू आणि सेवा यावर एकच कर लागतो. व्हॅट, एक्साईज व सेवा कर याप्रमाणे 32 वेगवेगळे कर देशातून काढून एकच कर लागू करण्यात आला त्याला GST म्हणतात. GST म्हणजे वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी लावलेला कर आहे.

What is GST in Marathi

याची घोषणा 1 जुलै 2017 रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केली. GST येण्या आधी दोन प्रकारचे कर डायरेक्ट (प्रत्यक्ष) कर आणि इन डायरेक्ट (अप्रत्यक्ष) कर असे भरावे लागत होते. डायरेक्ट टॅक्स मध्ये आयकर, मालमत्ता कर, गिफ्ट कर, संपत्ती कर, महानगरपालिका कर, वारसाकर इत्यादी कर भरावे लागायचे. तीन डायरेक्ट कर यामध्ये सतरा प्रकारचे कर होते, जसे की उत्पादन शुल्क, विक्री कर, कस्टम शुल्क कर, व्हॅट इत्यादी. त्यामुळे सर्व कर रद्द करून एकच कर केला गेला तो म्हणजे GST शुल्क होय. हा कर वस्तू आणि सेवांवर लावला जातो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही एका वस्तूवर त्याची किंमत पूर्ण देशात ही सारखीच असेल. देशातल्या कोणत्याही भागात ग्राहकांना त्या वस्तूवर सारखाच कर भरावा भरावा लागतो.



GST चे चार प्रकार

1) IGST – जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पुरवली जाते तेव्हा आय जी एसटी लागू एखाद्या वस्तू किंवा सेवांची विक्री, हस्तांतरण, विनिमय यासह इत्यादींचा पुरवठा या अंतर्गत केला बऱ्याच वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो. अशा परिस्थितीत त्याला दुसऱ्या राज्यात खरेदी केलेल्या वस्तूंवर आय जी एसटी द्यावा लागतो.

2) SGST – जेव्हा कोणतीही वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर एस जीएसटी आकारला जातो. हा कर राज्याला मिळतो. जीएसटी कायद्या अंतर्गत राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्री वर आकारला जातो. मात्र यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. एस जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा व्हॅट, लक्झरी टॅक्स, करमणूक कर इत्यादी आकारल्या जाणाऱ्या इतर करांचे अस्तित्व बंद झाले.

3) CGST – एका राज्यात खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणाऱ्या वस्तू किंवा सेवांवर सीजीएसटी आकारला जातो. जेव्हा एखादा दुकानदार तुमच्याकडून एस जीएसटी शुल्क आकारतो, त्याच वेळी तो तुम्हाला सीजीएसटी देखिल आकारतो आता प्रत्येक वस्तू ही निर्धारित केलेल्या कर दरा खाली म्हणजे समजा एखाद्या वस्तू वरील कराचा दर हा 28 टक्के आहे तर त्यातील 14 टक्के कर हा एस जीएसटी आणि उर्वरित 14 टक्के कर हा सीजीएसटी म्हणून आकारला हा कर केंद्र सरकारकडे जातो.



4) UTGST – हा कर एस जीएसटी प्रमाणे असतो. यातील मुख्य फरक म्हणजे हा कर वसूल करण्याचा अधिकार केवळ केंद्रशासित प्रदेशांना आहे. म्हणजेच ज्या प्रकारे राज्य सरकार एस जीएसटी गोळा करते तसेच केंद्रशासित प्रदेश युटीजीएसटी गोळा करतात.

GST परिषदेने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू साठी GST चे पाच टप्पे केले आहे.

  • GST कर नसलेली वस्तू: जीवनासाठी आवश्यक असलेल्या जसे, अन्नधान्य, मीठ, गूळ, ताज्या भाज्या, न्यायिक कागदपत्रे, वर्तमानपत्र, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी.
  • 5% GST कर असलेले वस्तू: साखर, तेल, मसाले, चहा, कॉफी, आयुर्वेदिक औषधे, मिल्क पावडर, अगरबत्ती, पिझ्झा ब्रेड, खते इत्यादी.
  • 12% GST असलेले कर: रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की स्नॅक्स, टूथपेस्ट, छत्री, तूप, लोणी, चीज, लोणचे, भ्रमणध्वनी, औषधे इत्यादी
  • 18%GST वर असलेले वस्तू: डिटर्जंट चॉकलेट मिनरल वॉटर, परफ्युम, दूरदर्शन, वॉशिंग मशीन, पेस्ट्री आणि केक, आईस्क्रीम, रेफ्रिजेटर, शाम्पू, इत्यादी
  • 28% GST कर असलेले वस्तू: लक्झरी आणि हानिकारक असणाऱ्या वस्तू पानमसाला, सिगारेट, ऑटोमोबाईल, पंचतारांकित हॉटेल राहणे, वेंडींग मशीन, सिमेंट, डिश वॉशर इत्यादी.

नोट – वरची GST कारासंबंधीची माहिती, प्रत्येक वर्षाच्या बजेट मध्ये बदलते याची नोंद घ्यावी

अशा प्रकारे आपण आज GST बद्दल माहिती बघितली, तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट करून नक्की सांगा.