गाडीचा चलन/फाइन कसा भरावा? (2 मिनिटात) | Maharashtra Police Challan Payment Online
नमस्कार मित्रांनो, आजकाल भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत सर्वच गोष्टी ऑनलाइन होऊ लागल्या आहेत, आणि यातच ट्राफिक पोलिसांकडून तुमच्या गाडावरचे चलन म्हणजेच तुमच्या गाडीवरचा दंड (फाइन) हि ऑनलाइन तुमच्या गाडीच्या नंबर वर जमा केला जात आहे. तर हे चलन कसे चेक करायचे आणि चुकून चलन फाडले गेले असेल तर त्याची तक्रार कशी करायची याची माहिती आजच्या लेखात आपण करून घेऊयात.
तुम्ही गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत ट्राफिक नियमांचे उल्लंघन होते, आणि ते रस्त्यावर लागलेल्या CCTV मध्ये कैद झाले किंवा ट्राफिक पोलिसांकडून तुम्हाला अडवले गेले तर तुमच्या गाडीवर हे चलन ऑनलाइन फाडले जाते. या चुकांमध्ये सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादीचा समावेश असतो.
जेव्हा चलन फाडले जाते तेव्हा तुम्हाला मेसेज येतो, तेव्हा तुम्हाला समजते कि तुमची काहीतरी चूक झालेली आहे. कधी कधी चलन फाडले गेल्यानंतर तुम्हाला मेसेज येत नाही त्यामुळे तुमची झालेली चूक तुम्हाला कळत नाही, आणि हि चूक पुन्हा पुन्हा होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नियमित तुमच्या गाडीवर असलेले चलन ऑनलाइन चेक करत जा. म्हणजे तुम्हाला तुमची चूक समजून ती पुन्हा होणार नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता.
तसेच तुमची चूक नसतानाही तुम्हाला फाइन लावला जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑनलाईन याची तक्रार कशी करायची ? आणि जर खरंच चूक झालेली असेल तर हा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ? हे आपण आजच्या लेखात बघणार आहोत. सर्वात आधी आपण तुमच्या गाडीचा असलेला फाइन ऑनलाईन कसा चेक करायचा आणि तो ऑनलाइन कसा भरायचा ते सोप्या स्टेप मध्ये समजून घेऊ.
चलन ऑनलाईन कसे चेक करायचे ?
स्टेप 1: मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईट वर जायचे आहे.
महाराष्ट्र ट्रॅफिक चलन वेबसाइट लिंक => mahatrafficechallan.gov.in
स्टेप 2: वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. या फॉर्म च्या वरती तुम्हाला दोन ऑपशन दिसतील 1) वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि 2) चलन नंबर (Challan No.) हे दोन ऑप्शन दिसतील.
जर तुमच्याकडे चलन नंबर असेल तर दुसऱ्या ऑपशन वर क्लिक करून तुम्ही चलनाची माहिती घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे चलन नंबर नसेल आणि तुम्हाला तुमच्या गाडीवरचे सर्व चलन बघायचे असतील तर पहिला ऑपशन निवडा.
नंतर पहिल्या (Enter Vehicle Number) बॉक्स मध्ये तुमच्या गाडीचा नंबर टाका. आणि दुसऱ्या (Enter last 4 digits of Chassis/Engine no.) बॉक्स मध्ये चेसी नंबरचे (Chassis/Engine no.) शेवटचे चार आकडे टाका. नंतर I’am not robot हा कँपचा कोड सोडवा. आणि नंतर सबमिट (Submit) बटन वर क्लिक करा.
स्टेप 3: आत्ता नवीन नवीन पेज तुम्हाला तुमच्या गाडीवर आत्तापर्यंत किती इ-चलन फाडले गेले आहेत याची लिस्ट दिसेल.
या लिस्टवर थोडे बाजूला स्क्रोल करून प्रत्येक चलनावर किती फाईन आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि फाईन कोणत्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे लागला आहे तेव्ही तुम्हाला समजेल. तसेच पेमेंट स्टेटस (Payment Status) कॉलम वर Paid असेल लिहिलेले असेल तर तो फाईन तुम्ही भरलेला असतो. जर पेमेंट स्टेटस (Payment Status) हा Unpaid असेल तर तो फाईन तुम्हाला भरायचा असतो.
तसेच दोन नंबरच्या कॉलम हा View चा असतो त्याखाली डोळ्याचे चिन्ह असते त्यावर क्लिक करून तुम्ही त्या चलनाची संपूर्ण माहिती बघू शकता. या माहिती मध्ये…
- चलन नंबर / Challan No.
- चलन तारीख / Violation Date
- ड्राइविंग लाइसेंस नंबर / License No.
- गाडीचा नंबर / Vehicle No.
- पेमेंट स्टेटस / Payment Status
- चलनाचे पैसे / Amount
- चलनाची लोकेशन / Challan Location
- पुरावे / Evidences
- चलनाची कारणे / Violation(s)
या माहितीमध्ये पुरावे / Evidences भागात क्लिक केल्यावर ज्यावेळी चलन फाडले गेले त्यावेळचा
फोटो जोडलेला असतो. तर हा फोटो तुमच्या गाडीचा आहे का, ते एकदा चेक करा. जर हा फोटो तुमचा नसेल तर तुम्ही तक्रार करू शकतात. याची तक्रार करण्यासाठीची लिंक त्यावरच तुम्हाला मिळेल. तक्रार म्हणजेच Grievance चा ऑप्शन असेल तिथे आपण तक्रार दाखल करू शकतो.
चलनचा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ?
वरील माहिती बरोबर असेल तर त्या चलनाचा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ते बघू.
स्टेप 1: सर्वात आधी चलनाची लिस्ट असलेल्या आधीच्या पेज वर या, ज्या चलनाचा फाइन भरायचा आहे त्यावर टिक करून वरती असलेले Select echallans & Click here to pay बटन क्लिक करा.
स्टेप 2: आता पेमेंटच्या Terms and conditions, Security Policy वाचून घ्यायच्या आहेत. नंतर ॲग्री (Agree) ऑप्शन वर टिक करा. नंतर तुम्हाला उजव्या बाजूला Pay Now चे बटन येईल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 3: पुढच्या पेज वर तुम्ही Pay Through BillDesk या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4: आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिले जातील जसे कि… क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, QR Code किंवा UPI
या ऑप्शन पैकी तुम्हाला जो पर्याय सोपा वाटतो त्यावर क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता.
आम्ही येथे QR Code हा ऑप्शन निवडत आहोत. या ऑपशन मधून पेमेंट कसे करायचे ते बघू. आत्ता QR या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 5: या नंतर Make Payment या बटन वर क्लिक करा. हा ऑप्शन तेव्हाच येतो, जेव्हा तुम्ही BillDesk ने पेमेंट करता.
स्टेप 6: पुढच्या पेज वर तुम्हाला थोडे खाली स्क्रोल केल्यावर QR Code दिसेल, त्यावर क्लिक करा. तो मोठा होऊन तुमच्यासमोर दिसेल. आता तुम्हाला तुमच्या आवडत्या UPI अँप ने तो QR Code स्कॅन करून पेमेंट करा. किंवा वरती बॉक्स मध्ये तुमचा UPI नंबर टाकून Make Payment बटन वर क्लिक करा. नंतर त्या UPI अँप वर जाऊन पेमेंट पूर्ण करा.
स्टेप 7: पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल ची स्क्रीन तुम्हाला दिसेल. आता त्या हिरव्या लाईनवर असलेल्या Here वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची रिसीट दिसेल. नंतर ती रिसीट तुम्ही डाऊनलोड करायची. अशा प्रकारे तुम्ही इ-चलन किंवा फाईन भरलेला आहे. आता तुम्ही परत वेबसाईटवर जाऊन वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि चलन नंबर (Challan No.) टाकून स्टेटस पाहू शकता. तिथे Payment Status मध्ये तुम्हाला चलन Paid झालेला दिसेल.
अशाप्रकारे आज आपण इ-चलन म्हणजेच फाईन ऑनलाईन पद्धतीने कसा चेक करायचा आणि तो ऑनलाइन कसा भरायचा ते बघितले. तुम्हाला जर हा लेख लेख वाचून फायदा झाला असेल आणि तुम्हाला लेख माहितीपूर्ण वाटत असेल तर तुमच्या जवळच्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. आभारी आहोत.
हे हि वाचा => ड्राइविंग लायसन्स ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे ?
Tags: e challan, e challan challan, traffic police challan, e challan traffic, traffic challan website, traffic e channel, e vahan challan, online challan traffic, vahan challan, traffic challan, online traffic challan, traffic e challan online, e challan vahan, online rto challan, driving licence challan, traffic challan check, my traffic challan, police e challan, traffic violation challan, online car challan payment, check car challan online, pay car challan online, online car challan, car online challan, delhi traffic police challan, delhi traffic police online challan check, four wheeler challan, car challan online, car challan check, rto challan pay online, find traffic challan, e challan online payment app, vehicle online challan, car challan payment, e challan payment app, my car challan, online vehicle challan check, online traffic police challan, rto fine payment online, check online vehicle challan