गूगल पे अँप मधून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे ? | How to Pay Credit Card Bill through Google Pay ?
नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन लेखात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गूगल पे च्या माध्यमातून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे ते जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, गूगल पे अँप चा उपयोग तर हा सर्वांना माहीतच आहे, पण आता या गूगल पे अँपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट ही करू शकणार आहात. ते कसे? तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
गूगल पे च्या माध्यमातून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मध्ये असलेले गुगल पे अँप ओपन करायचे आहे. त्यानंतर गूगल पे अँपच्या होम पेज वर तुम्हाला Pay Bills असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लीक करायचे आहे.
स्टेप 2: त्यानंतर तुमच्या समोर काही Payment Categories दिसतील. त्यातील Credit Card Bill Payment या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 3: यानंतर तुमच्या समोर काही क्रेडिट कार्ड बँकेची लिस्ट ओपन होईल. त्यापैकी तुमचे क्रेडिट कार्ड ज्या बँकेचे असेल किंवा ज्या बँक क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट करायचे आहे, त्या बँकचे नावाचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे.
स्टेप 4: त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये Nickname टाकायचे आहे. किंवा तुम्हाला जर निकनेम (Nickname) टाकायचे नसेल तर तुम्ही हा ऑप्शन स्कीप (skip) पण करू शकता. आता या नंतर तुम्हाला खाली दिलेले Link account या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड ऍड होऊन जाईल.
स्टेप 5: यानंतर त्याच पेज वर तुम्हाला काही Pay चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लीक केल्यावर नेक्स्ट पेज वर तुम्हला परत तुमचा क्रेडिट कार्ड चे पहिले 12 नंबर म्हणजेच अंक टाकायचे आहे.
स्टेप 6: आता तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड नंबर व्हेरिफाय करायचा आहे. जर तुमचा नंबर बरोबर असेल तर खाली दिलेल्या Continue या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 7: मित्रांनो, Continue या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल. तुमचे क्रेडिट कार्ड चे जेवढे बिल असेल तेवढी अमाउंट तुम्हाला तिथे टाकायची आहे व नंतर बरोबरच्या चिन्ह वर क्लीक करायचे आहे.
स्टेप 8: आता तुम्हाला ज्याबँके मार्फत पेमेंट करायचा आहे व जे बँक अकाउंट गुगल पे ला जोडले (ऍड) आहे. त्या बँकेचे नाव सिलेक्ट करून नंतर तुम्हाला Pay या ऑप्शन वर क्लीक करायचे आहे. आता नेक्स्ट पेज वर UPI Pin (यूपीआई पिन) टाकायचा आहे. यूपीआई पिन (UPI Pin) टाकल्यावर तुमचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट होऊन जाईल. फक्त त्याला दोन ते तीन दिवस लागू शकता.
तर मित्रांनो, अश्या पद्धतीने गूगल पे च्या माध्यमातून तुमचे क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट होऊन जाईल.
महत्वाची टीप – मित्रांनो, गूगल पे च्या माध्यमातून जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करता तेव्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे गूगल पे वरून क्रेडिट कार्ड चे बिल पे व्हायला दोन ते तीन दिवस लागू शकता. त्यामुळे क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट करण्यासाठी दिलेल्या ड्यु डेट (Due Date) च्या चार दिवस आधी तुम्हाला क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट करायचे आहे, जेणे करून तुमचे क्रेडिट कार्ड चे बिल वेळे वर भरले जाईल व तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्तीचा चार्ज द्यावा लागणार नाही.
तसेच जर तुम्हाला लगेच (Instant) क्रेडिट कार्ड बिल पे करायचे असल्यास तुम्ही Cred App च्या मार्फत ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल पे करू शकता. त्यावर बिल पे करायला जास्त वेळ लागत नाही ,लगेच तुमचे बिल पेमेंट होते. या अँपच्या माध्यमा तून क्रेडिट कार्ड बिल पे केल्यास तुम्हाला कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण गुगल पे वरून क्रेडिट कार्ड चे बिल पेमेंट कसे करायचे या बद्दल माहिती जाणून घेतली. आशा करतो की तुम्हाला या माहितीचा नक्की च उपयोग होईल. तसेच आज चा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास व महत्व पूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद।