जिओ सिमचा PUK कोड ऑनलाइन कसा काढावा ?

जर तुमचं जिओ सिम लॉक झालं तर, आणि तुम्हाला PUK कोड मागितला जात असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज तुम्हाला तुमच्या जिओ सिम चा PUK ऑनलाइन कसा काढावा हे सांगणार आहे. त्याआधी PUK म्हणजे काय? याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.

PUK चा फुल फॉर्म Personal Unblocking Key असा आहे. PUK कोड हा सिम कार्ड च्या सुरक्षितेसाठी बनवला गेलेला आहे जो तुमच्या सिम कार्ड चा दुरुपयोग होण्यापासून वाचवतो. जेव्हा तुम्ही मोबाईल मध्ये सिम लॉक सुविधा चालू करता अशा वेळेला तुम्हाला PUK हा विचारला जातो. मोबाईल चालू केल्यावर जेव्हा तुम्हाला तुमचं सिम पीन विचारला जातो आणि तीन वेळा चुकीचा पिन टाकल्यावर, PUK कोड हा विचारला जातो. कस्टमर केअरला कॉल केल्यानंतर ही तुम्हाला तुमचा PUK कोड हा भेटू शकतो. पण आज आपण ऑनलाइन जिओ सिम PUK कसा काढावा हे बघणार आहोत.



खालील स्टेप च्या आधारे तुम्ही तुमचा PUK कोड ऑनलाइन काढू शकता

How To Unlock Jio SIM PUK Code information in Marathi

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोन मधल्या गुगल क्रोम मध्ये जायचं आहे.



स्टेप 2: त्यानंतर तुम्हाला तुमचा गूगल क्रोम मध्ये Jio Login असे टाईप करायचे आहे आणि सर्च करायचे आहे.

स्टेप 3: तुम्ही सर्च केल्यानंतर पहिली Jio ची वेबसाईट येईल Login | Jio त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 2

स्टेप 4: त्यानंतर तुम्हाला ते परवानगी मागतील की तुम्हाला तुमचा PUK हा गुगल क्रोम मधून पाहिजे आहे की My Jio मधून तर तुम्हाला गुगल क्रोम हे सिलेक्ट करायचा आहे. आणि Login here ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 4

स्टेप 5: पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या नंबर चा PUK कोड पाहिजे आहे, तो नंबर तुम्ही तिथे टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुम्हाला Proceed या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 5

स्टेप 6: त्यानंतर पुढच्या पेजवर आल्यानंतर Select Category ऑपशनवर क्लिक करून तुम्हाला अजून तीन ऑप्शन दिले जातील.

  • Option 1- Date of Birth
  • Option 2- Alternate Number
  • Option 3- Linked Number

यापैकी ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 6

जर तुम्ही Date of Birth ने लॉगिन करणार असेल तर तुम्हाला तुमची Date of Birth हे ऑप्शन सिलेक्ट करून तुमची जन्मतारीख (आधार कार्ड वर असलेली) टाकायची आहे. मग तुम्हाला Submit ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: Submit ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर सिलेक्ट केला असेल तो येईल त्याचबरोबर त्या मोबाईल नंबर लिंक असलेले मोबाईल नंबर देखील तुम्हाला दिसतील. आणि जो मोबाईल तुमच्याजवळ उपलब्ध आहे तोच मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर Generate OTP या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 7

स्टेप 8: जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे या नंबर वर तुम्हाला एक OTP येईल तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला Submit या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 8

स्टेप 9: आत्ता नवीन पेज उघडेल, तिथे थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तुमचा PUK कोड दिसेल. तो कोड टाकल्यानंतर तुमचं सिम कार्ड हे अनलॉक होईल.

How To Unlock Jio SIM PUK Code Step 9

अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन PUK काढू शकता.