डिजिटल हेल्थ कार्ड: ऑनलाईन नोंदणी, फायदे, तोटे सविस्तर माहिती | ABHA Digital Health ID Card
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात आपण भारत सरकारच्या आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ आयडी कार्ड मिशन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय, ABHA नंबर म्हणजे काय, या डिजिटल हेल्थ कार्डचे फायदे, तोटे काय आहेत इत्यादी माहिती बघणार आहोत.
मित्रांनो, डॉक्टर कडे जाताना प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स घेऊन जावे लागतात का, तुमच्या तुमच्या मागच्या आजार विषयी माहिती सांगावी लागते का, तर मग आता काळजी करण्याची काही गरज नाही, कारण आता भारत सरकारने नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा प्राप्त होण्यासाठी डिजिटल हेल्थ आई डी कार्ड ही सुविधा सुरू केली आहे.
सर्वात पहिले डिजिटल हेल्थ आई डी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या:
डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय ?
What is Digital Health ID Card
मित्रांनो आपल्या पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ला येथे आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ आयडी कार्ड या अभियान संबंधित एक घोषणा केली होती. या अभियाना अंतर्गत भारतातील प्रत्येक नागरिकाला एक हेल्थ आयडी कार्ड देण्यात येणार आहे. हा आयडी क्रमांक 14 अंकी असणार आहे. ज्यात त्या नागरिकाच्या आरोग्य विषयक सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरूपात सेव्ह राहणार आहेत. म्हणजे च या हेल्थ आयडी कार्ड मध्ये एखादा नागरिक भारतात कुठेही उपचार घेत असेल तर त्याला कोणता आजार आहे, या आधी त्या आजारा वर उपचार कुठे व कधी घेतली या संबंधीचे सर्व रेकॉर्ड्स किंवा सर्व वैद्यकीय टेस्ट संबंधित सर्व रेकॉर्ड्स या कार्ड मध्ये असणार आहेत.
मित्रांनो, हेल्थ कार्ड अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असे आहे, की नागरिकांना आपल्या हेल्थ विषयीच्या सर्व नोंदी, सर्व रेकॉर्ड्स एकाच ठिकाणी ठेवता याव्यात. थोडक्यात, आरोग्य संबंधित सर्व रेकॉर्ड्स हे पेपरलेस करून डिजिटल करणे. तसेच आपल्या आरोग्याच्या संबंधित असणारे इतर जुने रेकॉर्ड्स ही आपल्या हेल्थ आयडी शी कधीही लिंक करता याव्यात.
नोट: बऱ्याच लोकांचा डिजिटल हेल्थ कार्ड अणि आयुष्यमान भारत कार्ड यामधे गोंधळ होत आहे. जर हा लेख फक्त डिजिटल हेल्थ कार्ड बद्दल आहे. जर तुम्हाला 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या आयुष्यमान भारत कार्ड बद्दल माहिती पाहिजे असे तर हा लेख वाचा: =>आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड सोप्या सरळ भाषेत माहिती<=
डिजिटल हेल्थ कार्ड कसे तयार करावे
How to Create Health ID Card
मित्रांनो, तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. चला तर मग मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड कसे काढावे ते जाणून घेऊ या.
स्टेप 1: मित्रांनो, हेल्थ आयडी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ऑफिशियल वेबसाईट healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल. नंतर तुम्हाला वेबसाईटच्या होम पेज वर Create ABHA Number असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.
स्टेप 2: नंतर पुढच्या पेज वर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन ऑपशन दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायविंग लायसनचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता. आम्ही येथे आधार कार्ड माध्यमातून हेल्थ कार्ड तयार करत आहोत.
नोट – जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ड्रायविंग लायसन पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल नंबर वर OTP येणार आहे.
स्टेप 3: पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि I Agree वर टिक करून i am not robot वर क्लीक करायचे आहे व कॅप्चा सॉल्व्ह करायचा आहे नंतर Submit या बटन वर क्लीक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबर वर OTP येईल तो बॉक्स मध्ये टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4: नंतर तुम्हाला Aadhaar Authentication Successful असा मेसेज दिसेल, आणि खाली आधार मध्ये फीड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा चेक करून , नंतर तुम्हाला Next बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आत्ता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे, जो ABHA ला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल.
स्टेप 6: आता पुढच्या पेज वर तुम्हाला तुमचा ABHA नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा नंबर ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार नंबर असतो तसा. हा 14 अंकी नंबर लक्षात ठेवणे कठीण जाते त्यामुळे ABHA ने ABHA ऍड्रेस सुविधा चालू केली आहे, या मध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे name1234@abdm
त्यासाठी तुम्ही आधी Link ABHA Address बटन वर क्लिक करा. नंतर No वर टिक करून Sign Up for ABHA Address बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7: आत्ता तुम्हाला तुमचे आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA नंबर, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 8: आत्ता लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA नंबर किंवा तुमचा मोबाइल नंबर आणि जन्मवर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 9: आत्ता तुम्हाला OTP साठी कोणत्या मोबाइल नंबर वर OTP पाठवावा ते विचारले जाईल 1) आधार लिंक मोबाइल नंबर 2) ABHA नंबर लिंक मोबाइल नंबर. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 10: पुढच्या पेज वर तुमचे ADHA नंबर कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.
स्टेप 11: जर कार्ड मध्ये काही माहिती चुकलेली असेल तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑपशन वर क्लिक करा. आणि उघडलेल्या पेज वर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा.
तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून ABHA अकाउंट चा पासवर्ड सेट करू शकता .
मित्रांनो, हे हेल्थ कार्ड प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य नाही ये. पण प्रत्येकाने या हेल्थ कार्डचा वापर करावा असा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
डिजिटल हेल्थ कार्ड कसे वापरावे
जेव्हा तुम्ही उपचार किंवा वैद्यकीय टेस्ट करायला जाता तेव्हा तुमचे हेल्थ कार्ड पुढे करून त्यामध्ये माहिती भरायला सांगावे. या योजनेची माहिती बऱ्याच दवाखाने, हॉस्पिटलला माहित नाही त्यामुळे तुम्हाला माहिती भरताना अडचण येऊ शकते. तसेच दवाखाने, हॉस्पिटल ला या योजनेत सहभागी जाल्यानंतरच तुमची माहिती भरता येते आणि या योजनेचा जास्त प्रसार न झाल्यामुळे माहिती भरताना अडचण येऊ शकते. मोठ्या हॉस्पिटल आणि सरकारी दवाखान्यात तुम्हाला तुमचे हेल्थ कार्ड भरून घेताना जास्त अडचणी येणार नाहीत.
आयडी कार्ड चे फायदे
आता या डिजिटल हेल्थ आयडी कार्ड चे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या
- मित्रांनो, हेल्थ आयडी कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही भारतात कुठेही गेलात आणि जर तुम्हाला ऍडमिट व्हावे लागले तर तुमच्या या हेल्थ आयडी कार्डच्या सहाय्याने तुम्ही तुमचे जुने रेकॉर्ड्स डॉक्टर ला दाखवून योग्य ते उपचार घेऊ शकता.
- तसेच तुम्ही तुमच्या हेल्थ आयडी शी तुमचे इतर हेल्थ डिटेल रेकॉर्ड्स कधीही लिंक करू शकता.
- आपल्या हेल्थ शी निगडित सर्व रेकॉर्ड्स या हेल्थ आयडी कार्डमध्ये रजिस्टर असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजारा विषयी असणारे कागदपत्रे जवळ ठेवण्याची आवश्यकता नाही.
- एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या मुलांचे हेल्थ आयडी कार्ड बनवू शकता. तसेच तुमचा हेल्थ आयडी ऍक्सेस म्हणून एखादा नॉमिनी सुद्धा जोडू करू शकता. हा नॉमिनी तुमचे हेल्थ रेकॉर्ड पाहण्यास व त्यांना मॅनेज करण्यात तुमची मदत करू शकतो.
- तुमचे सर्व हेल्थ रेकॉर्ड्स हेल्थ आयडी द्वारे डॉक्टर बघू शकतात. त्यामुळे डॉक्टरांना तुमचे पुन्हा पुन्हा चेकअप करावे लागणार नाहीत.
हेल्थ कार्ड चे तोटे
मित्रांनो, हेल्थ आयडी कार्डचा सर्वात मोठा तोटा म्हणचे यात असलेल्या तुमच्या माहितीची सुरक्षा नाही मिळत. म्हणजेच हेल्थ कार्डमध्ये असलेल्या तुमच्या हेल्थ डेटाची चोरी होण्याची शक्यता असू शकते. आणि ही आरोग्य संबंधित माहिती सायबर क्रिमिनलला आकर्षित करू शकते. तसेच हेल्थ कार्ड मधील माहिती हॅक करून त्यात बदल केले जाऊ शकतात. म्हणजे रुग्णाच्या आजार व उपचार मध्येच बदल केले गेले तर हे खूपच धोकादायक आहे. कारण यामुळे संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतू शकत. तसेच भारतात डेटा सुरक्षा कायदा नसल्याने लोकांच्या आरोग्यची माहिती सुरक्षित ठेवणे शक्य नाही.
तर मित्रांनो अश्या प्रकारे तुम्ही तुमचे हेल्थ कार्ड बनवून भारतात कोठेही, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता. मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास व महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. व त्यांनाही हेल्थ आयडी कार्ड तयार करण्यास सांगून या डिजिटल हेल्थ आयडी कार्ड अभियानात सहभागी व्हायला सांगा. धन्यवाद।
Tag: Health id card, Health card, Ayushman bharat yojana, Ayushman bharat yojana, Ayushman card, Arogy Card, Health Card Kadhane, Health Card tayar karne, Health card banavne, Health Card Marathi, आरोग्य कार्ड, Health Card Online Tayar Karne